खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील सुकीवली मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खासगी स्कूल बस व रिक्षा यांच्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्यां अपघातात ५ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी भरणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमी विद्यार्थी
शहरातील दोन नामवंत विद्यालयात शिक्षण घेत आहेत. स्कूल बस व रिक्षाने विद्यार्थी आपापल्या घरी जात असताना दोन वाहनांमध्ये अपघात घडला. अपघाताचे वृत्त कळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यालय व्यवस्थापनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले.
या अपघात प्रकरणी मोहन बागस्कर ३५ रा वेरळ ता खेड यांनी तक्रार दाखल केली त्या नुसार बस चालक सतीश जगन्नाथ जगदाळे रा भरणे घडशी वाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी हे यांची कार क्रं. एम.एच.०५ बी.एम. १४१४ मधुन आंबवली कडुन खेडच्या दिशेने येत असताना सुकीवली सोनारवाडी या ठिकाणी समोरुन येणारी बस क्रं. एम.एच.२० बी.एल.१४३६ चे चालक याने बेदरकारपणे बस चालवुन फिर्यादी यांची कार व फिर्यादी यांच्या पाठीमागुन येणा-या पिकअप क्र एम.एच.०८ ए.पी. २२८५ समोरुन धडक देवुन अपघातास कारणीभुत नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे












