यशतेज फाउंडेशनतर्फे भव्य तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

मंडणगड – क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने यशतेज फाउंडेशन, मंडणगड यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून, कॅरमप्रेमींसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

उद्घाटन समारंभ

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये –

श्री. अक्षय ढाकणे (तहसीलदार, मंडणगड)

श्री. विशाल जाधव ( गटविकास अधिकारी मंडणगड)

श्री. नितीन गवारे (पोलीस निरीक्षक, मंडणगड)

श्री. एन. के. शिंदे (गटशिक्षणाधिकारी, मंडणगड)

 

रविवार, ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व असून, या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सामने रंगणार आहेत.
प्रमुख उपस्थितांमध्ये –

श्री. आबासाहेब हुलगे (मुख्याध्यापक आंबेडकर हायस्कूल)

डॉ. श्री. राहुल जाधव (प्राचार्य मुंढे कॉलेज )

दीपक घोसाळकर, श्रीकांत जाधव, भाऊसाहेब टुले, अरुण ढंग, राम राठोड, अनिल रटाटे , राजा पारेख, अशोक सुर्वे, सौ. पवळ आदी मान्यवर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

बक्षीस वितरण समारंभ

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे. यावेळी क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचे वैशिष्ट्ये

तालुक्यातील उत्कृष्ट कॅरमपटूंसाठी हि स्पर्धा मोठ्या संधीचे व्यासपीठ ठरणार आहे.

खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा आणि क्रीडासंस्कृती बहरावी, हा मुख्य उद्देश आहे.

सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.

यशतेज फाउंडेशनच्या वतीने सर्व खेळाडूंना व सहभागी स्पर्धकांना खूप शुभेच्छा देण्यात आल्या.