सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहा लाखांचा अपहार

crime fraud

सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहा लाखांचा अपहार
सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत तब्बल ६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. त्याच बँकेत कार्यरत असलेल्या एका लिपिकाने २ ग्राहकांच्या मुदत बंद ठेवींची रक्कम परस्पर आपली पत्नी व आई यांच्या नावे वर्ग केली असून याबाबतची तक्रार संबंधित बँकेच्या रत्नागिरी विभागीय अधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत ग्राहकांनी ठेवलेल्या मुदत ठेवी त्याच बँकेतील एका लिपिकाने परस्पर आपल्या पत्नी व आईच्या नावाने केल्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या वार्षिक चौकशी अहवालात म्हणजेच ऑडिट मध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर याबाबत स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयात माहिती दिल्यावर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. याबाबतची याबाबतची तक्रार एस जी काळे यांनी दाखल करून घेतली असून एपीआय कातिवले अधिक तपास करीत आहेत.