घोगरेमध्ये १७ रोजी शिव जन्मोत्सव सोहळा

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील घोगरे- जाखणवाडी येथील युवा प्रतिष्ठानच्यावतीने १७ मार्च रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ९ वाजता छत्रपतींची प्रतिष्ठापना, प्रतिमा पूजन, दीप पूजन, सायंकाळी ६ वाजता माणगाव येथील शिव व्याख्याते रामजी कदम यांचे व्याख्यान होईल. रात्री ८ वाजता महाप्रसाद झाल्यानंतर सांगता होईल. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.