रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या वतीने गुरुवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता पटवर्धन हायस्कूल येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम होईल. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वर्गखोल्यांच्या देणगीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, उपाध्यक्ष विनायक हातखंबकर, कार्यवाह संजय शिवलकर, सहकार्यवाह राजेंद्र कदम, खजिनदार संतोष कुष्टे यांच्यासह इतर सदस्यांनी नियोजन केले आहे.











