चिपळूण : डेरवण येथे सुरू असलेल्या ११व्या यूथ गेम्समध्ये विविध १८ खेळांच्या स्पर्धा पार पडत असून, या स्पर्धेच्या निमित्ताने एसव्हिजेसिटी क्रीडासंकुलास क्रीडानगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या यूथ गेम्समध्ये मंगळवारी पार पडलेल्या बास्केट बॅाल स्पर्धेमध्ये सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलने वर्चस्व प्राप्त केले आहे. या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम तर प्रिन्स युनायटेड या प्रशालेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. १४ वर्षांखालील मुलींमध्ये एन.बी. हुप्स (अ ) २२ गुण मिळवून प्रथम तर सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलने २० गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १४ वर्षांखालील मुलांमध्ये रणजित अकॅडमीने २१ गुण मिळवून प्रथम व फ्लाय बास्केटबॅाल (अ) द्वितीय क्रमांक; तर १६ वर्षांखालील मुलांमध्ये सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलने ३० गुण मिळवून प्रथम व फ्लाय बास्केटबॅाल संघाने २० गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
–
चौकट : “आम्ही आमचे संघ घेऊन अनेक ठिकाणी खेळण्यासाठी जातो. परंतु अनेक ठिकाणी बास्केटबॅाल खेळण्यासाठी खुल्या पद्धतीचे कोर्ट उपलब्ध असते. अशा विविध प्रकारच्या खुल्या वातावरणात खेळताना खेळाडूंचे मानसिक संतुलन बिघडण्याच्या घटना आम्ही नेहमीच पाहतो. परंतु डेरवण येथील एसव्हिजेसिटी या क्रीडासंकुलात अद्ययावत असे बंदीस्त कोर्ट उपलब्ध असल्याने खेळाडूंचा उत्साह तर द्विगुणित होतोच. पण, खेळावर लक्ष्य केंद्रित करून आपले ध्येयही साध्य करता येते. त्यामुळे संस्थेने अशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून बास्केटबॅालसह इतर खेळांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे” अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे विरकुमार पाटील यांनी दिली.
—
चिपळूण












