लायन्स क्लब ऑफ सावर्डेचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा सावर्डे येथील केदारनाथ बहुउद्देशीय हॉलमध्ये सोमवार दि. २९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शपथविधी व पदग्रहण अधिकारी म्हणून MJF PDG लाय. उद्धव लोध यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीने शपथ घेतली.
यावेळी ला. डॉ. कृष्णकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ला. प्रा. प्रकाश राजेशिर्के, सचिवपदी ला. राजेश कोकाटे व खजिनदारपदी ला. डॉ. अरुण पाटील यांनी पदग्रहण केले. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत नेटके व उत्साही वातावरणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी लायन्स क्लब सावर्डेचे मावळते अध्यक्ष ला. सतीश सावंत, संस्थापक अध्यक्ष ला. गिरीश कोकाटे, माजी अध्यक्ष ला. विजय राजेशिर्के, ला. डॉ. कृष्णकांत पाटील, ला. सीताराम कदम, ला. अशोक बिजितकर, ला. डॉ. अमोल निकम, आदिती निकम, ला. डॉ. दर्शन पाटील, ला. डॉ. समीर चिवटे, ला. देवराज गरगटे, ला. तुषार मोहिते (लायन्स क्लब चिपळूणचे माजी अध्यक्ष), ला. कुलकर्णी, ला. श्री. इंदुलकर, गॅलेक्सी क्लब चिपळूणचे माजी अध्यक्ष ला. देवळेकर, ला. जाधव, लाय. राठोड, संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. श्री. शिंदे तसेच चिपळूणचे माजी सभापती सौ. पूजा निकम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ला. देवराज गरगटे यांनी तर ला. गिरीश कोकाटे यांनी आभार मानले. नव्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
फोटो फाईल- सीपीएन३१-५