भाजप पदाधिकारी नंदकिशोर चव्हाण यांनी केली तक्रार
रत्नागिरी : प्रतिनिधी :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंट वर बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या मूळच्या कुडाळ आणि सध्या डोंबिवली येथे राहणाऱ्या नंदकिशोर पेडणेकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी भाजपा पदाधिकारी नंदकिशोर चव्हाण यांनी तक्रार दाखल केली असून शहर पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजपकडून सतेज नलावडे,राजन फाळके,चंद्रकांत राऊत,तुषार देसाई आदी उपस्थित होते.
या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात नंदकिशोर पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सखोल चौकशीनंतर लागलेल्या गुन्ह्याचा कलमात वाढ होण्याची शक्यता आहे.










