गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजप सेना महायुतीचे उमेदवार अपूर्वा बारगोडे व कोंडकारूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रणव पोळेकर यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार घरोघरी गावोगावी वाडी वस्त्यांवर जाऊन प्रचार करत आहेत. केंद्र व शासनाच्या विविध योजना तसेच त्यांनी केलेली विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
कोंड कारूळ भागामध्ये माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या पत्नी डॉ.विनिता विनय नातू या घरोघरी प्रचार करत आहेत. यावेळी डॉ.विनिता विनय नातू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,केंद्र व राज्य शासनाच्या योजना आम्ही प्रत्येक घरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा काम करत आहोत, त्याचबरोबर उमेदवारांची निशाणी ही मतदारापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही महिला करत आहोत. तसेच आमच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये महायुतीसाठी चांगले वातावरण आहे, आपल्याला ९ तारखेला समजू शकेल, मतदार हे त्यांचे विकास कामे उमेदवार व कार्यकर्त्यांना सांगत आहेत, आम्ही फक्त प्रचाराचे काम करत आहोत, विकास कामे निवडून दिलेले उमेदवार करणार असतात. सर्व ठिकाणी चांगल्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. कोंडकारूळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अँड. अपूर्वा बारगोडे यांनी सांगितले की, गेली साडेचार पाच वर्षे आम्ही सर्व जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहोत, परंतु आम्हाला पक्षाने उमेदवाराची भूमिका दिल्याने आम्ही निवडणुकीचा प्रचार म्हणून फिरत आहोत, सर्व मतदारांशी आमच्या संपर्क असून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.
येथील जनतेच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत, लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, जिल्हा परिषद पेक्षा मोठ्या गरजा नागरिक सांगत आहेत, आम्ही निवडून येणारच आहोत परंतु या सर्व गरजा सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, मतदारांनी युतीच्या सरकार बरोबर राहावं, आमचं सरकार हे विकासाचे सरकार आहे, त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा, घरोघरी प्रचार करण्यासाठी भाजप सेना महायुतीचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते.












