खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोईमतूर-हिसार एक्सप्रेसला कुमठा आणि कुंदापुरा रेल्वे स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर २ अतिरिक्त थांबे मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार २२४७६/२२४७५ क्रमांकाची कोईमतूर-हिसार एक्सप्रेस १५ मार्चपासून दोन्ही स्थानकांवर थांबणार आहे. यापाठोपाठ २२६५३/२२६५४ क्रमांकाची तिरुवअनंतपूरम-निजामुद्दीन एक्स्प्रेस व २२६५५/२२६५६ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेसही कुंदापुरा स्थानकात थांबणार आहे. यामुळे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने दिलासा मिळाला आहे.











