लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर यांचा ही वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार
वेंगुर्ले|प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून वायंगणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी महिलाची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली .
ही तपासणी मुंबईतील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथका करवी करण्यात आली.या पथकात डॉ.अजेय शिंदे एम डी( बालरोग तज्ज्ञ व त्वचा रोग, गुप्त रोग तज्ज्ञ ) डॉ माया शिंदे (स्त्री रोग तज्ज्ञ) डॉ शिवकुमार कोरी( मधुमेह तज्ञ शल्य विशारद)
सौ मालती कोरी (लॅब तज्ञ रक्त) आदी तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होते.या आरोग्य शिबिराला महिलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
तर दुसऱ्या दिवशी खेळ पैठणीचा, पाककला स्पर्धा ,फनी गेम स्पर्धा आणि ग्रुप डान्स कार्यक्रमा सोबतच पाककला स्पर्धेचे बक्षिस वितरण आणि विशेष मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
या विशेष सत्कार आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सिंधुदूर्ग जिल्ह्या बॅक अध्यक्ष श्री.मनिष दळवी होते .याच बरोबर या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, कोकण साद संपादिका देवयानी वरसकर , पपू परब साईप्रसाद नाईक यांची ही प्रमुख उपस्थितीत होती
या सत्कार सोहळ्यात एक समृद्ध लोककला -दशावतार या पुस्तकाचे लेखन करून दशावतार लोककलेची समृद्धता जगासमोर मांडणारे लोककला अभ्यासक उपक्रमशील अध्यापक, सुप्रसिद्ध निवेदक प्रा.वैभव खानोलकर यांचा विशेष सत्कार मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना या लेखन कार्यात ज्यानी ज्यानी सहकार्य केले त्याचा हा सत्कार असुन या सगळ्या वतीने मी हा स्विकारतो अशा भावना व्यक्त करत हा सत्कार घडवून आणणारे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच अविनाश दुतोडकर, उपसरपंच रविंद्र धोंड या सह सर्व सदस्य यांसह पुर्ण वायंगणी ग्रामस्थांचे आभार खानोलकर यांनी व्यक्त केले.
होम मिनिस्टर कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले तर पाककला स्पर्धा परीक्षण प्राची धुरी यांनी केले.या कार्यक्रमाच्य यशस्वीते साठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी विशेष योगदान दिले.












