भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आमदार निलेशजी राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले फळांचे वाटप


रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार,महायुतीचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार,कोकणचे आश्वासक नेते मा.श्री.निलेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी ठेऊन रत्नागिरीतील आविष्कार संस्थेचे सौ.सविता कामत विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी वर्ग तसेच संस्थेच्या माध्यमातून आ.निलेशजी राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.सतेज नलावडे, चिटणीस श्री.अशोक वाडेकर,श्री.भाई जठार, श्री.नित्यानंद दळवी,श्री.पिंट्या देसाई,स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी श्री शरद पालकर,श्री.अनिल पावसकर, श्री.तुषार देसाई,श्री.संजीव बने,श्री.अशोक पावसकर,श्री.गोट्या सावंत त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कांबळे,व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर,नितीन चव्हाण,बाबासाहेब कांबळे,विनिता पवार,तीर्था रेवाळे आदी पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.