खेडमध्ये ८ थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडल्या

खेड(प्रतिनिधी)
खेड नगर परिषदेने थकित पाणीपट्टी धारकांविरोधात पुन्हा कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसात ८ थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडल्या. सातत्याने सूचना व नोटीसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकितदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याने थकितदारांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासन अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासनाने जानेवारी महिन्यात थकित पार्णीपट्टीधारकांना दणका देण्यास सुवात केली होती. ७० हून अधिक जणांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केल्यानंतर सर्वच थकितदारांनी पाणीपट्टी भरणा केल्यानंतर त्यांचा खंडित पाणीपुरवठा पूर्ववत कैला होता. गेल्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम तूर्तास थंडावली होती. या पथकात पाणी विभागातील उमेश रेपाळ, पाणीपुरवठा अभियंता अक्षय लोहार, प्रणित जाधव, राजेश खेडेकर, मुकेश पेवेकर, सुनील पिलदणकर, सुयोग शिर्के, निखिल यादव आदींचा समावेश आहे.