सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यावर्षीच्या ग्रंथोत्सवात वाचकांची गैरसोय झाली त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो व पुढल्या वर्षीचा ग्रंथोत्सव भव्य दिव्य असेल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्घाटनाच्या प्रारंभीच दिली. भावी पिढीला वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी डिजिटल ग्रंथालय व आवश्यक सोयी सुविधा निर्माण करू असेही ते म्हणाले.
सिंधुनगरी येथील अध्यपत्रकार बाळासाहेब जांबेकर स्मारक व पत्रकार भावनांमध्ये दोन दिवशी या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव संपन्न होत आहे. याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे व ग्रंथप्रेमी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत सिंधुनगरीच्या प्रवेशद्वाराकडील अश्वारूढ पुतळ्याकडून ग्रंथदिंडी नेण्यात आले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. या निमित्ताने ग्रंथ स्टॉलना मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन सर्वांचे स्वागत केले.












