१३ लाख ८० हजार ३६७ रूपये रक्कम वसुल
फौजदारीच्या २५ प्रकरणांवर पडदा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी तालुका वकील बार असोसिएशन यांच्या वतीने सावंतवाडी न्यायालयात शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व वादपूर्व अशी एकुण १११ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. अशा प्रकरणातून सुमारे १३ लाख ८० हजार ३६७ रुपये एवढी रक्कम सामोपचाराने वसूल करण्यात आली.तर फौजदारीच्या २५ प्रकरणावर पडदा पडला.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीम. जे. एम. मिस्त्री यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकअदालतीचे समई द्धिपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पॅनेल सदस्य ॲड. सौ. वेदिका राऊळ, ॲड. सौ निता सावंत गावडे, ॲड. स्वप्नील कोलगावकर व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस, पक्षकार उपस्थित होते.
लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील ३१ प्रकरणे तसेच ग्रामपंचायत, बीएसएनएल, बँका, वितरण कंपनी अशी ८० वादपूर्व प्रकरणे मिळुन एकुण १११ प्रकरणे सामंज्यसाने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. अशा प्रकारणाव्दारे सुमारे
१३ लाख ८० हजार ३६७ रूपये समोपचाराने वसुल करण्यात आली.
या लोकअदालतीमध्ये बँका, ग्रामपंचायत, बीएसएनएल, वीज वितरणाचे अधिकारी व कर्मचारी, न्यायालयाचे सहा. अधीक्षक, श्रीम. वहीदा मीर, वरिष्ट लिपिक सौ. आर्या अडुळकर, दिवाकर सावंत व संतोष राऊळ, लघुलेखक उदय हुंडेकर, लिपिक सौ. रावराणे, कु. स्वर्णिमा कोलगांवकर, सौ. हालेसीन डिसोजा, सौ. अवनी शिंदे, सिध्देश देसाई, सौ. कदम, कु. शुभम शिंदे तसेच चपराशी अभय चव्हाण आदी न्यायालयीन कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.












