ओटवणे (प्रतिनिधी). ओटवणे येथील स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे बुवा स्वप्नील म्हापसेकर यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीमुळे भजन प्रेमी मधून अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छा देण्यात येत आहेत. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय ल गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी प्रमोद टक्के यांनी ही निवड केली.या निवडीमुळे ओटवणे दशक्रोशीला दुहेरी मुकुट मिळाले आहे नुकतीच या मंडळाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी सरमळे येथील भजनी बुवा संजय गावडे बुवा यांची निवडही करण्यात आली आहे.दोन्ही बुवांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.
भजन कलेची लहान पणा पासून असलेली आवड आणि ध्यास यामुळे विध्यार्थी दशेतच भजनाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. त्यांनी भजन कलेची जोपासना करतानाच भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत भजन हे केवळ उपजीविका,पैसे कमविण्याचे साधन नसून आपल्या भजनी सेवेने परमेश्वरापर्यंत पोचण्याचा हा भक्तिमार्ग आहे असे मानून सातत्याने परमेश्वराची सेवा म्हापसेकर बुवा करीत आहेत . त्यांनी आतापर्यंत अनेक भजन स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्या सुमधुर आवाजाने पारितोषिके पटकाविली आहेत.नवोदित युवा भजनी स्पर्धेत परीक्षक म्हणून ही काम पाहिले आहे.
ओटवणे गावानेच त्यांना डबलबारी क्षेत्रात उतरण्यासासाठी संधी दिली त्यामुळे गेल्या काही वर्षात
स्वप्निल म्हापसेकर बुवा डबलबारी ही करत आहेत.भजन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान भजन सेवेप्रति असणारी त्यांची निष्ठा आणि आस्था या सर्वांची पोचपावती म्हणजे अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी करण्यात आलेली निवड .
गुरुवर्य संगीत विशारद बुवा कृष्णा राऊळ यांच्याकडून त्यांनी भजन कला आत्मसात केली. गुरुवर्य बुवा गुंडू सावंत तसेच बुवा प्रवीण सुतार आणि गुरुवर्य पखवाज विशारद माऊली आनंद मोर्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.आपण ही कला आजन्म जोपसणार असून आपल्याकडून परमेश्वराची आजन्म सेवा घडो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली व आपल्या निवडी बद्दल अखिल मुंबई कोकण प्रासादिक मंडळाचे आभार मानले.त्यांच्या या निवडी बद्दल अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत.











