भजन स्पर्धेत महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी प्रथम!

मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित निवडक भजन स्पर्धकांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेमध्ये महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी- कुडाळचे बुवा प्रसाद आमडोसकर यानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक श्री रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट-पंचक्रोशी चे बुवा आशिष सडेकर यानी तर तृतीय क्रमांक श्री जैतिर कृपा प्रासादिक भजन मंडळ कुडाळचे बुवा सिध्देश नाईक पटकाविला आहे. श्री देवी भगवती मंदिर येथे सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित एकवीस दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम भगवती मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले होते. विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, आकर्षक चषक, देवीची फोटो प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन,सचिव निषाद परूळेकर व मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या भजन स्पर्धेत सात निमंत्रित भजनी बुवानी सहभाग घेतला होता. यामध्ये उत्कृष्ट गायक म्हणून श्री गांगोरामेश्वर प्रा.भजन मंडळाचे बुवा जयेश घाडी यांची , उत्कृष्ट कोरस म्हणून श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर – देवगड यांची आणि उत्कृष्ट पखवाज वादक महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे पखवाज वादक प्रथमेश राणे यांची निवड करण्यात आली. त्याना आकर्षक चषक प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन विश्वस्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर उत्तेजनार्थ म्हणून श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी, ता-वेंगुर्ले चे बुवा अनिकेत भगत, श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोयरे ता-देवगडचे बुवा जयेश घाडी ,श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठिवडे ता-मालवणचे बुवा अक्षय परूळेकर आणि श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर, ता-देवगडचे बुवा अतुल मेस्त्री याना देवस्थानच्यावतीने रोख रक्कम ,प्रशस्तीपत्र, आकर्षक चषक, देवी भगवतीची फोटो प्रतिमा व गुलाबपुष्प देवून देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यास्पर्धाचे परिक्षण संगीत अलंकार बुवा रुपेंद्र परब, व पखवाज विशारद आनंद मोर्ये यानी केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परूळेकर विश्वस्त प्रकाश सावंत, कृष्णा ऊर्फ दादा सावंत, पुरूषोत्तम तेली,वसंत शेट्ये, मनोहर मुणगेकर , रामचंद्र मुणगेकर,आनंद घाडी ,वसंत शेट्ये , भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक व भजनी बुवा देवदत्त ऊर्फ आबा पुजारे, शैलेश सावंत, वैभव शेट्ये, चंद्रकांत रासम, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत,

रामतीर्थ कारेकर, सुरेश बोरकर, शंकर मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यानी मानले.