टेटवलीत घर- गोठ्याला आग लागून 7 लाखांचे नुकसान

दापोली l प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील टेटवली सरोदेवाडी येथे घर व गोठयाला आग लागून 7 लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजूच्या घर मालकांच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.

रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास गोठ्या आग लागल्याचे तेथे काम करणाऱ्या कामगाराला दिसून आले. गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत वाड्यात असणारी 13 म्हैशी व 3 गायींना सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र घर लाकडी व कौलारू असल्याने क्षणार्थ आगीने रौद्ररूप धारणे केले. खेड येथील अग्नीबंबाच्या सहाय्याने आग अटोक्यात आणण्यात आली. या आगीत फ्रीज, एसी अशा प्रकारच्या मोठ्या किमंतीच्या साहित्याचे शिवाय घरातील सर्वच साहित्याचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत गंगावणे यांच्या बाजूला असलेले श्रीकृष्ण गंगावणे यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्यांच्या घरातील मोठ्या किमतीचे अर्थात फ्रीजसह इतर साहित्य चंद्रकांत गंगावणे यांच्या इथे ठेवण्यात आले होते. ते देखील आगीत भस्मसात झाल्याचे समोर आले आहे. शिवाय गुरांसाठी जवळपास 15 हजार पेंढा तर इतर मोठ्या प्रमाणात खाद्य देखील वाड्यात ठेवण्यात आला होता. मात्र तो देखील जळून राख झाला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.