सावंतवाडी । प्रतिनिधी :
शारदा विद्यालय मळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तावाडी या प्रशालेला भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी दोन संगणक संच व आर्थिक मदत देणगी स्वरूपात दिली. यावेळी सचिन राऊळ, पांडुरंग विजय राऊळ, अंकुश राऊळ, देवेंद्र राऊळ, विश्वनाथ गोसावी, विवेक नार्वेकर, बंटी मेस्त्री, विजय ठाकूर तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सुर्वे, सहशिक्षिका श्रीमती सीमा सावंत, सहशिक्षिका श्रीमती अस्मिता गोवेकर तसेच अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व भिल्लवाडी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्यावतीने पांडुरंग राऊळ यांचे आभार मानण्यात आले.
Sindhudurg











