कोकण मार्गावर चाकरमान्यांच्या गर्दीचा ओघ ओसरला

पर्यटकांमुळे गाड्या फुल्ल, उन्हाळी स्पेशलच्या आरक्षित तिकिटांसाठी धडपड
खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी चालवण्यात आलेल्या होळी स्पेशल यार्डात विसावल्या आहेत. नियमित रेल्वे गाड्यांना होणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीचा ओघही ओसरला आहे. चाकरमान्यांची गर्दी रोडावली असली तरी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्या पर्यटकांमुळे आतापासूनच फुल्लच घावत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या उन्हाळी स्पेशल गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी आता चाकरमान्यांची धडपड सुरू आहे.
शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी-मडगाव, एलटीटी-मडगाव, एलटीटी-तिरुवअनंतपूरम, दादर-रत्नागिरी,एलटीटी-मडगाव होळी स्पेशलसह पनवेल-चिपळूण अनारक्षित स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या. पनवेल-मडगाव होळी स्पेशलही
चालवण्यात आली. सर्वच होळी स्पेशल विक्रमीच गर्दीन धावल्या. चाकरमान्यांची संख्या रोडावल्याने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील गर्दीही ओसरली आहे. पर्यटकांना आतापासूनच गोव्याचे वेध लागले आहेत.
रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टी हंगामासाठी उथना-मंगळूर उन्हाळी स्पेशलपाठोपाठ, सीएसएमटी-करमाळी, एलटीटी-करमाळी, एलटीटी-तिरुवअनंतपूरम उन्हाळी स्पेशल जाहीर केल्या आहेत. २४ मार्चपासून उन्हाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षणही खुले झाल्याने पर्यटक कमालीचे सुखावते. आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक झुंबड उडाली
उन्हाळी स्पेशल १० पासून
शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्यानंतर चाकरमान्यांनाही गावचे वेध लागणार आहेत. यामुळे उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची आतापासूनच धडपड सुरु आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टी हंगामासाठी जाहीर केलेल्या स्पेशल १० एप्रिलपासून कोकण मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानेही आतापासून सुसज्जता ठेवण्यास सुरुवात केली आहे.