खेड (प्रतिनिधी) भरणे परिसरात गेल्या ६ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. परिसराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भरणे जॅकवेल येथील पंपांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे.यामुळे टँकरद्वारे विकतच्या पाण्यावर तहान शमवावी लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भरणे जॅकवेल पंपांमध्ये बिघाड होत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यातील विस्कळीतपणा दूर करण्यासाठी कुठल्याच ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. एकीकडे सतत बिघडणाऱ्या पंपांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची तसदी ग्रामपंचायत घेत नसल्याने नागरिकांचा पाण्यासाठीचा त्रास वाढू लागला आहे.









