व्हाईस चेअरमन पदी शिवप्रसाद चौकेकर यांची निवड
चौके – प्रतिनिधी :– वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.चौके ता.मालवण या पतसंस्थेच्या चेअरमनपदी पत्रकार संतोष गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर व्हॉइस चेअरमनपदी शिवप्रसाद चौकेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी विधमान चेअरमन श्री. सुरेश चौकेकर व जेष्ठ संचालक सर्वाचे मार्गदर्शक श्री.कृ.बा.करलकर यांनी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन याना शुभेच्छा दिल्या.
सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्येक्षतेखाली दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता संस्था कार्यालय या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.याच सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी अजय हिर्लेकर,कृ.बा.करलकर,विधमान अध्यक्ष सुरेश चौकेकर,संचालक सुनिल चव्हाण,अरविंद तावडे,कमलाकर गावडे,विजय चौकेकर,विश्वनाथ गावडे,यमुना गोवेकर,अतुल मांलडकर,मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मोर्ये उपस्थितीत होते. या बिनविरोध निवडी बद्दल चौके पंचक्रोशीतुन अभिनंदन केले जात आहे.











