वेंगुर्ले | प्रतिनिधी :श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ला आयोजित वेंगुर्ल्याचे श्रद्धास्थान, ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात गुढी पाडव्याच्या रविवार ३० मार्च रोजी सायंकाळी मंदिरात “दिपोत्सव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.
रविवार ३० मार्च रोजी संध्या.६ वाजता दिपोत्सव सोहळा त्यानंतर सायंकाळी ७ वा. आरती व तीर्थ प्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दिपोत्सवास सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











