पारंपरिक मच्छिमारांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट

अनधिकृत एलईडी लाईट मासेमारी प्रश्नी निवेदन : कठोर कारवाई बाबत आमदार निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मालवण | प्रतिनिधी : पारंपारीक मच्छिमारांचे प्रश्न पहिल्याच अधिवेशनात मांडताना त्याना न्याय देणाऱ्या आमदार निलेश राणे यांची मालवण येथील पारंपरिक मच्छिमारांनी भेट घेतली. मालवण समुद्रातील पुन्हा एलईडी लाईट मासेमारीच्या सुरु असलेल्या घुसखोरी बाबत कठोर कारवाई व्हावी याबाबत निवेदन दिले. आमदारांनी तात्काळ प्रतिसाद देत सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय मालवण यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. अशी माहिती भाजपा मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

बंदरे व मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी या खात्याचा पदभार स्वीकारल्या नंतर एलईडी लाईट बोटिंवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. कारवाई सुरूच आहे. गेल्या महिनाभरात कोकणकिनारपट्टीवर अनेक बोटिंवर कारवाई झाली. मात्र आता रात्रीच्या वेळी वेळी मालवण खोल समुद्रात या बोटिंची घुसखोरी दिसून आली. त्याबाबत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, अन्वेशा आचरेकर, ललित चव्हाण, नारायण धुरी, छोटू सावजी, संमेश परब, मिथुन मालंडकर, कमलेश कोचरेकर, रश्मीन रोगे, भाऊ मोरजे, पांडुरंग पराडकर, सचिन तारी, मोहन कोयंडे, दाजी जोशी, संदीप मालंडकर, आबा वाघ, अखिल ढोके, सुजित मोंडकर, राजा सारंग, प्रशांत तोडणकर यांसह अन्य पारंपरिक मच्छिमार उपस्थित होते.

एल ई डी अनधिकृत फिशिंग करणाऱ्या बोटीवर कार्यवाही साठी फिशरीज विभागाने वास्तव अहवाल राज्य सरकारला पाठवावा याबाबत भाजपा शहर अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी मत्स्य अधिकारी यांना निवेदन दिले. मंत्री नितेश राणे यांनी या खात्याची जबाबदारी घेतल्या नंतर पारंपरिक मच्छिमार व्यावसायिकांना अपेक्षित निर्णय घेत आहेत प्रशासन ही चांगली कामगिरी करत आहे.. असेही बाबा मोंडकर म्हणाले.