श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांनी पाळला बलिदान मास..

वेंगुर्ले माणिक चौक येथे आज शेवटचा दिवस

वेंगुर्ले l दाजी नाईक :धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या नीच क्रूर वृत्तीच्या औरंग्याने तब्बल ४० दिवस यवन यातना देऊन छळ करीत मारलं. त्या प्रित्यर्थ वेंगुर्ले माणिक चौक येथे फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच २८ फेब्रुवारी ते आज २९ मार्च असा महिना आपल्या धाकल्या धन्याचं म्हणजेच शंभूराजांच्या बलिदानाचं सुतक श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांनी पाळल आहे. बलिदान मास चा आजचा शेवटचा दिवस.

यामध्ये श्रावणी गोकाककर, निधी परब, मानस परब, ओजस परब, गोविंदा कोळी, देवांग जगताप, यशराज कोयंडे, धारकरी प्रज्वल कोयंडे, सौ. प्रियांका कोयंडे तसेच मठ कावलेवाडी येथे धारकरी तेजसराव देसाई, साहिल परब,शुभम परब, आदिनाथ धर्णे

हे सर्व निस्वार्थ धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत.

यामध्ये विशेष म्हणजे आजच्या फॅशनच्या युगात सुद्धा श्रावणी गोकाककर, निधी परब व सौ. प्रियांका कोयंडे ह्या ताई सर्वस्व निश्चयाने पायात चप्पल न घालता धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत.

या सर्वांनी संपूर्ण एक महिना पायात चप्पल न घालणे, मुंडण करणे ,चहा, गोड पदार्थ न खाणे, मांसाहार न करणे, आवडीची गोष्ट न करणे, शुभ प्रसंग टाळणे हे त्याग केले आहेत. तसेच दररोज सायंकाळी ७ वाजता माणिक चौक व मठ कावलेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावून व शंभूराजेंना पुष्प अर्पण करुन श्री संभाजीसुर्यहृदय श्लोक म्हणून त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितला जातो व ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हटले जाते.

ही सर्व मुले हे सर्व का करत आहेत? काय मिळणार हे सगळं करुन? हे सगळं करायचं धर्मवीर बलिदान मास जगण्यासाठी. कारण ज्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या मंदिरात देव घरात देव्हारा आणि अंगणात तुळस, आई, बहिण, मुलगी, पत्नी यांच्या कपाळावर कुंकू आहे. आज जे आपण हिंदू म्हणून जगतोय कारण आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी जे भोगलंय ते जगात कुणीच केलं नसेल. याची जाणीव प्रत्येक हिंदूला व्हायला हवी. सुदैवाने आता छावा चित्रपट प्रदर्शित झालाय, त्यामुळे उभ्या जगाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समजत आहे .पण श्री शंभूराजांचे बलिदान वाचून,ऐकून व चित्रपट पाहून समजण्याएवढे स्वस्थ नाही ते जाणून घेण्यासाठी पाळावा लागतो तो धर्मवीर बलिदान मासच. ह्या मुलांची प्रेरणा घेऊन असंख्य मुलांनी धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे आणि सध्याची परिस्थिती पाहता ही काळाजी गरज बनली आहे,असे या मुलांचे म्हणणे आहे.