७० वर्षावरील ७० जेष्ठ नागरिकांना प्रत्येकी ५ लाख रकमेचे आरोग्य कार्ड वितरित

रत्नागिरी l प्रतिनिधी : माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांच्या आजारपणात त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. विठ्ठल मंदिर संस्था जेष्ठ नागरिक कट्टा यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर येथे या योजनेअंतर्गत एकूण ७० वर्षांवरील ७० गरजूंना कार्डचे वाटप करण्यात आले. याला ज्येष्ठ नागरिकांनी यांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

शनिवार दिनांक 29.3.2025 रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झालेले कार्ड वितरण काम दुपारी 3 वाजता पूर्ण झाले. जेष्ठ नागरिक कट्टा संयोजक सर्वश्री सुरेश लिमये, समाज भूषण सुरेंद्र घुडे, संस्थेचे खजिनदार प्रमोद शेठ रेडीज, अरविंद वांदरकर, शिरीष वारंग,सुरेंद्र शेट्ये, दत्ताराम लिंगायत, अविनाश गावंडे यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. अनेकांना हा विषय उशिरा कळल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे काही दिवसानी पुन्हा एकदा अशा प्रकारे शिबीर आयोजित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे संयोजक, समाजभूषण सुरेश लिमये, सुरेंद्र घुडे यांनी संबंधितांना कळविले.