दापोली (प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील आसुद येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) यांचा प्रगटदिन उत्सवाचा कार्यक्रम मिती चैत्र शुध्द प्रतिपदा ते द्वितीया शके 1947 श्री विश्वावसु नाम संवत्सरे रविवार दिनांक 30 मार्च 2025 तसेच सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी साजरा होणार आहे. या कार्यक्रमानिमित रविवार दि. 30 मार्च 2025 (गुढीपाडवा) पहाटे 5 ते 5.30 वाजता श्रींची पूजा, पहाटे 5.30 ते रात्रौ 8 वाजता श्रीगुरुचरित्र पारायण (वे. मु.श्री. अनिरुध्द पेंडसे व सहकारी, रात्रौ 8 नंतर श्रींची आरती व मंत्रपुष्प तसेच सोमवारी 31 मार्च 2025 रोजी (श्री स्वामी जयंती), सकाळी 8.30 ते 10.30 वाजता श्रींच्या पादुकांची पूजा व लघुरुद्र, सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वा. (वे.मु.श्री. रामेश्वर परांजपे व सहकारी), दुपारी 12.30 वाजता होमहवन, दुपारी 1 ते 3 वा. श्रींची आरती व मंत्रपुष्प, दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद, सायं. 7 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, रात्रौ 9.30 ते 11 वाजता श्रींची आरती व मंत्रपुष्प, संगीत सेवा (देविदास दातार व सहकारी) आदि प्रकारच्या भरगच्च धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन श्री. वैभव विजय जोशी संस्थापक श्री स्वामी समर्थ मठ आसुद यांच्या वतीने करण्यात आले आहेत. तरी
भावीकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाचे संचालक वेदमूर्ती वैभव जोशी यांनी केले आहे.











