कणकवली I मयुर ठाकूर : तालुक्यातील कलमठ येथे एका दुचाकी मध्ये पान घणस जातीचा साप आढळला त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. अवेंजर गाडी कलमठ येथील एका हॉटेल जवळ उभी होती. मात्र थंडीच्या वाढत्या सणसणीमुळे सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. मग असे प्राणी आसऱ्याच्या बाबतीत कधी गाड्यांमध्ये तर कधी घराच्या ठिकाणी रवानगी करतात. असाच प्रकार कलमठ मध्ये एका दुचाकीमध्ये दिसून आला चक्क पान घणस जातीचा साप एका दुचाकीमध्ये शिरला मात्र दैव बलवत्तर म्हणून तो दुचाकीस्वार बचावला. तोंडाच्या बाजूनं साप आतमधे होता अन शेपटी बाहेर होती त्यामुळे दुचाकी चालवण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराला काही इजा झाली नाही. हा प्रकार सायंकाळी ७:५० वा. घडला. कलमठ मध्ये असे प्रकार वारंवार घडत असतात असे तिथे असलेल्या नागरिकांमधून बोलले जात होते.
Snake found in motorcycle; Udali Tarambal
यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी देखील जमा झाली होती. अनेक खडतर प्रयत्नानंतर त्या सापाला बाहेर काढण्यास यश आले व सर्पमित्र धनराज च्या मदतीने बंदिस्त करून त्याला नैसर्गिक बंदिवासात सोडण्यात आले. आता खबरदारी म्हणून सर्वच वाहनचालकांनी थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या जवळील वाहनांची तपासणी केल्याशिवाय वाहने मार्गस्थ करू नये अन्यथा त्याचा आपल्या जीवास धोका होऊ शकतो.