जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करावे -सहाय्यक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड
रत्नागिरी, ) : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबईच्या निवडणुकीकरिता दि. 3 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई निवडणूक 2025 सहाय्यक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 17 जानेवारी 2025 असाधारण क्रमांक 3 मध्ये प्रसिध्द झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबई निवडणूका 2025 नुसार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणुकीकरिता मतदान दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. जिल्हयासाठी खाली नमुद ठिकाणी मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार 41 असून त्यापैकी 9 उमेदवारांना निवडणून द्यावयाचे आहे.
मतदान केंद्र क्र. रत्नागिरी – 2/1 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होडेकर रोड, पटवर्धनवाडी रत्नागिरी – शरीररचना शास्त्र विभाग, तळमजला, खोली क्र.1 येथे 1 ते 250 असे 250 मतदार मतदानासाठी निश्चित केलेले आहेत.
मतदान केंद्र क्र.रत्नागिरी – 2/2 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होडेकर रोड, पटवर्धनवाडी रत्नागिरी –शरीररचना शास्त्र विभाग, तळमजला, खोली क्र.2 येथे 251 ते 500 असे 250 मतदार मतदानासाठी निश्चित केलेले आहेत.











