गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आणि विक्री, चार महिन्यात ४६ गुन्हे दाखल

२ कोटी ५ लाख ३८,४९५ किमतीचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

लांजा (प्रतिनिधी) गोवा बनावटीच्या दारूची विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागात रत्नागिरी कार्यालयाने धडक मोहीम राबवताना जानेवारी ते एप्रिल या जवळपास चार महिन्याच्या कालावधीत ४६ गुन्हे दाखल केले असून २ कोटी ५ लाख ३८,४९५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी कार्यालयाने गोवा बनवटीच्या दारूची विक्री करणाऱ्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच मोहिमेंतर्गत जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४६ गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र मुंबईचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता विभाग संचालक प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या विभाग अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरी यांनी विशेष कामगिरी करताना गोवा बनावटीच्या विदेशी मध्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या इसमांवर ४३ वारस गुन्हे आणि ०३ बेवारस गुन्हे असे एकूण ४६ गुन्हे दाखल केले असून एकूण १५६०१.२३ ब. लिटर इतका गोवा बनावटीचा मध्य साठा जप्त करून दोन वाहनांसह २ कोटी ५ लाख ३८ हजार ४९५ इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदरच्या कारवाईमध्ये भरारी पथक रत्नागिरी विभागाचे निरीक्षक ए.ए.पाडळकर, निरीक्षक आर. जी.मोरे, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभाग, दुय्यम निरीक्षक जी.सी जाधव, रत्नागिरी, दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी क्रमांक तीन चे जवान एम.एस. पवार, व्ही.आर. सोनावले, एन जे तुपे, एस आर टीकार, व्ही के भोसले, एस एस उबाळे, आर यु लोंढे, एन एन सुर्वे, महिला जवान श्रीमती एस ए. घुडे, यांनी सहभाग घेतला.