शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशी नं. १ येथील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला. परीक्षेस शाळेतील १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉन्झ मेडल पटकावत घवघवीत यश मिळवले.
या प्रशालेतील राघव गावकर (१०० पैकी ९७ गुण) आणि तन्वी भोसले (१०० पैकी ९६ गुण) या दोन विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले. तसेच मेधांश कोदले (१०० पैकी ९२ गुण), आरुषी वरेरकर (१०० पैकी ९० गुण) आणि सात्विक सोनमनकर (१०० पैकी ८९ गुण) यांनी सिल्व्हर मेडल मिळवले.
तसेच नैतिक लब्दे, पूर्वा पारकर आणि पार्थ लब्दे या तिघांनीही १०० पैकी ८६ गुण मिळवत ब्रॉन्झ मेडल पटकावले. इतर विद्यार्थ्यांमध्ये आदिनाथ गावकर (८१ गुण), निधी मिराशी (७१ गुण), भक्ती मिराशी (७१ गुण), सांची साळसकर (६९ गुण), आराध्य तेली (४४ गुण) आणि ईश्वरी गावकर (३४ गुण) यांनी समाधानकारक गुण मिळवून यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर कदम सर, पदवीधर शिक्षक संतोष मराठे, ज्ञानोबा हाके तसेच उपशिक्षक प्रकाश झाडे आणि स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल या गावचे सरपंच सौ.वैशाली सुतार,उपसरपंच कैलास गावकर ,शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गावकर, उपाध्यक्षा त्रिशा निलेश गावकर, ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.












