किरकोळ कारणातून एका मुलाला मिरकरवाड्यात विक्रेत्याकडून मारहाण

crime marhan

मदतीला गेलेल्या भावासह त्याच्या साथीदारानाही जमावाने केली मारहाण

हिंदू संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहरा नजीकच्या मिरकरवाडा परिसरात मंगळवारी दुपारी एका मुलाला एका किरकोळ विक्रेत्याकडून मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्या मुलाने आपल्या भावाला मदतीला बोलवल्यानंतर मिरकरवाड्यात विक्रेत्या चाचा सोबत मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी मुलाच्या मदतीला आलेल्या लोकांनाही मारहाण केली. आमच्या गाडीवर हिंदू लिहिले म्हणू आम्हाला मारहाण झाली असल्याचा आरोप जखमी मुलाने आणि मुलाच्या भावाने केला आहे.

मिरकरवाड्यात मच्छी आणायला गेलेल्या अर्जुन उमेश चव्हाण हा १८ वर्षीय मुलगा येथील एका विक्रेत्याकडे पिशवी खरेदी करायला गेला. सुट्टे पैसे नसल्याने त्याने विक्रेत्या चाचा कडे स्कॅनर मागितला. त्यावेळी तो स्कॅनर बंद असल्याचे लक्षात आले, असे त्या मुलाने विक्रेत्याला सांगितल्यानंतर विक्रेत्याने ,’ अब मेरे मुह पे छाप’ अस उर्मट उत्तर दिले.

यावर मला तुमची पिशवी नको असे सांगून अर्जुन दुसऱ्या दुकानात जात होता त्यावेळी त्या मुलाला पुन्हा विक्रेत्याने बोलावले आणि तो मारहाण करू लागला. यावेळी अर्जुनने त्याच भाऊ करण याला बोलावले.
करण आणि त्याच्या सोबत दोघे तिघेजण तिथे पोहोचले. त्यावेळी त्या विक्रेत्यांसोबत अजून अनेकांची गर्दी जमली होती. त्यांनी अर्जुन सह त्याचा भाऊ आणि सहकाऱ्याना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर जखमी झालेल्या अर्जुनला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.

ही गोष्ट समजल्यानंतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तर शहर पोलिसांची अर्जुनचा जबाब नोंदवला आहे.

मिरकरवाड्यात आम्हाला सातत्याने त्रास दिला जात आहे, आमच्या गाडीवर हिंदू लिहिल्या आम्हाला त्रास दिला जात आहे असे अर्जुनने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.