सिने-नाट्य अभिनेते संजय नार्वेकर यांची लक्षवेधी उपस्थिती
दापोली | प्रतिनिधी: दापोलीतील उत्तम दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रसिध्द सिने अभिनेते संजय नार्वेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले तसेच श्रीनिवास रंगनाथ दांडेकर मुख्य प्रवेश द्वाराच्या नामफलकाचे अनावरण श्रीमती शरयु दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सारीका गुजराथी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व कथक नृत्याचे सादरीकरण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केले, याप्रसंगी शोभा दांडेकर, ॲड. महेश सागवेकर, शरयु दांडेकर यांनी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मनोगतातून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले संजय नार्वेकर यांनी आपल्या भाषणात दापोलीतील त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल कौतुक केले.
समीर गुजराथी सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी सिद्धी एज्युकेशन सोसायटी दापोलीचे संचालक हिमांशु देवरूखकर, साधना गुजराथी, ॲड. महेश सागवेकर, गजानन दाभोळे, श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडिअम स्कुलचे चेअरमन सुयश पाष्टे , मुख्याध्यापक अली सर, तसेच उमेखतिजा स्कुलचे मुख्याध्यापक गफूर सर, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे, जालगाव ग्रामपंचायत सदस्य साक्षी कदम, पोलीस पाटील पंकज कदम तसेच शाळेच्या सखी सावित्री, विद्यार्थी सुरक्षा समिती, माता पालक समिती ने सदस्य उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे पी.आर.ओ. विश्वजित तांबे, समन्वयक वर्षा वानरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गद्रे यांनी केले












