रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट, बदललेले वातावरण, दोन दिवस शिंतडणार्या सरीनंतर अखेर गुरूवारी पहाटे रत्नागिरी शहर आणि परिसराला मुसळधार पाऊस, वीज आणि वेगवान वाऱ्यानी झोडपून काढले.
या पावसामुळे गुरूवारी सकाळी तापमानात मोठी घट दिसून आली. गेले काही दिवस कोकणातील वातावरण बदलले आहे. उन्हाळा सुरी होत असतानाच वातावरणातला हा बदल कोकणातील काजू आणि आंब्याच्या मुळावर आला असून मोठे नुकसान अंदाजित आहेत. गेले दोन दिवस जिल्ह्यात राजापूरसह अनेक ठिकाणी किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्या होत्याच त्यात गुरूवारी पहाटे रत्नागिरी शहर आणि परिसराला वेगवान वारे वीजांसह पडलेल्या पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे उजाडलेल्या गुरूवारी सर्वत्र पावसाच्या खुणा दिसून येत होत्या. अंके ठिकाणी वीजही गायब झाली आहे.
या पावसामुळे सध्या जरी वातावरण घटले असले तरी लवकर तीव्र उन्हाळा सुरू होण्याचे हे संकेत आहेत.











