दैवज्ञ पतसंस्थेचा सुमारे ३५ लाखांचा नफा 

,

रत्नागिरी : येथील दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२४-२५ या वर्षात सुमारे ३५ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे.

 

गतवर्षीच्या तुलनेत व्यवहाराशी संबंधित सर्वच बाबींमध्ये उच्चांकी वाढ नोंद झाल्याचे पतसंस्थेचे चेअरमन विजय विनायक पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रका‌द्वारे जाहीर केले.

पतपेढीचे उपाध्यक्ष श्री दिपक गोविंद खेडेकर, सचिव सौ रत्ना सदानंद आचरेकर सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचाऱ्यांच्या काटेकोर नियोजन व अथक परिश्रमामुळे पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे पतसंस्थेचे चेअरमन यांनी स्पष्ट केले.

सन २०२४- २५ या आर्थिक वर्षापर्यंत पतसंस्थेचे १४६०० सभासद झाले. गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये वाढ झाली असून सन २०२४ २५ मध्ये एकूण ठेवी ४.९३ कोटी झाल्या आहेत. कर्ज वितरणामध्ये देखील वाढ झाली असून आर्थिक वर्षात ५.६१७ कोटी रु.चा कर्ज पुरवठा संस्थेमार्फत करण्यात आला आहे.