मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे भाजपच्या माजी नगरसेवकांनी केले स्वागत

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज त्यांची भेट घेऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आरिवडेकर, नासिर शेख, परिमल नाईक, आनंद नेवगी, उदय नाईक, सौ. दिपाली भालेकर आणि सौ. समृद्धी विरनोडकर आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांबाबत यावेळी चर्चा झाली. मुख्याधिकारी पाटील यांनीही सर्वांचे आभार मानले आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या भेटीमुळे नवनियुक्त मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.