खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावर मध्य रेल्वेने मडगाव-एलटीटी उन्हाळी स्पेशल ६ एप्रिलपासून धावणार आहे. ५ मेपर्यंत धावणाऱ्या स्पेशलमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशल ६ एप्रिल ते ५ मे दरम्यान दर रविवारी धावेल. मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात ७ एप्रिल ते ५ मे याकालावधीत स्पेशल दर सोमवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहचेल.









