खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा माल दुकानाच्या पाठीमागील एका गाळ्यात तीनपत्ती पानाचा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ९ संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई द २१ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आली यामध्ये ६ हजार ३० रुपये इतक्या रोख रक्कम जप्त करण्यात आली.
येथील खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राम गंगाधर नागुलवार यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार पोलिसांनी विशाल सोपान धारमोडे (२२), रंजित भिमसेन सोरेन (३४), मोहम्मद नसीम अन्सारी (३८), आसिफ मोहंमद इमाउद्दीन खान (३८), प्रमोद नारायण गुहागरकर (४९), तानू नानू पवार (३०), सत्यजित संजय पवार (२३); राजन हार हरधारे (६४) व प्रमोद जगदीश मेहता या ९ संशयित जणांना गुन्हा महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










