बहिरवलीत १० पासून हनुमान जन्मोत्सव शताब्दी

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील बहिरवली येथील जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान हनुमान जन्मोत्सव शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १० रोजी चित्रकला स्पर्धा, सांघिक खेळ, ११ रोजी पालखी मिरवणूक, हरिपाठ, दिंडी सोहळा, स्थानिक नृत्यकला, सांप्रदायिक भजन, १२ रोजी श्री हनुमान जन्मोत्सव, महाआरती, सत्यनारायणाची महापूजा, हळदीकुंकू समारंभ, ५०१ पणत्यांचा दीपोत्सव, महाप्रसाद, सांप्रदायिक भजन, स्वागत समारंभझाल्यानंतर सावर्डे-भुवडवाडी येथील केदारनाथ नमन मंडळाचा नमनाचा कार्यक्रम होईल.