कोकणातील आंबा बागायतदारांसाठी रामदास कदम आक्रमक; तुटपुंज्या मदतीवर सरकारवर टीका

खेड :
कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते Ramdas Kadam आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे एकमेव उपजीविकेचे साधन असलेला आंबा सध्या गंभीर संकटात सापडल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधीही शासनाकडे मदतीसाठी हात पसरले नाहीत. मात्र अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे येथील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत जर शासनाने तातडीने ठोस आणि भरघोस मदत केली नाही, तर कोकणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा कदम यांनी दिला.
सरकारने कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता तुटपुंज्या मदतीऐवजी भरघोस आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना मुबलक मदत करून त्यांना जगवावे, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या अल्प मदतीचा निर्णय मागे घेऊन अधिक निधी जाहीर करावा, अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली.