खेड(प्रतिनिधी)
खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अलोरे जलसंपदा विभागाची यंत्रणा जगबुडी नदीपात्रात तर नाम फाऊंडेशनची यंत्रणा नदीपात्रात कार्यरत आहे. मार्चअखेरीस जगबुडी नदीपात्रातून ४,४७१ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेत भरती-ओहोटीचा अडथळा येत असल्याने दोन पोकलेनच्या
सहाय्याने सकाळपासूनच गाळ उपसा प्रक्रिया सुरू होत आहे. दुपारच्या सुमारास यंत्रणांना विश्रांती घ्यावी लागत आहे. उपसलेला गाळ खासगी डम्परद्वारे शेतकरी स्वतःहून वाहून नेत आहेत. नाम फाऊंडेशनची यंत्रणाही गाळ उपसा प्रक्रियेत सहभागी झाल्याने गती मिळाली आहे. अलोरे जलसंपदा विभागाने मार्चअखेरीस १५८० ब्रास गाळ उपसला.










