जामगे प्राथमिक आरोग्य केंद्र अखेर खुले

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील आंबये, जामगे, शिवतर, घेरापालगड या दुर्गम भागासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले जामगे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी खुले झाल्याने पंचक्रोशीतील रुग्णांची चिंता कायमचीच मिटली आहे.

 

या प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत सुविधांमुळे रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
चाकाळे, मुरडे, आंबये, शिवतर तिसे, जामगे, घेरापालगड या गावांसाठी आवश्यक असणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आता वरदानच ठरणार आहे. माजी जि.प. सदस्य अरुण कदम यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. जामगे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणही सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

जामगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्याने या भागातील ज्येष्ठ व वयोवृध्द नागरिकांना उपचारासाठी आता फुरुस या ठिकाणी जावे लागणार नाही. आता जामगे प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचक्रोशीतील रुग्णांना तातडीचे उपचार मिळणार आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.