वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती
वेंगुर्ले : दाजी नाईक: आज रविवार ६ एप्रिल रामनवमी उत्सव असून देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. रामनवमीच्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी आरवली सोन्सुरे येथे प्रभू श्रीरामाचे सुंदर असे वाळूशिल्प साकारले आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हे वाळूशिल्प पाहण्यासाठी सकाळपासून नागरिकांची तसेच पर्यटकांची गर्दी होत आहे.
या वाळूशिल्पामध्ये श्रीरामाचा मुकुट, धनुष्य, दागिने आदी सूक्ष्म काम सुबक पद्धतीने बनविले आहे. त्यांना या वाळू शिल्पासाठी सुमारे तीन तास एवढा कालावधी लागला. गेली अनेक वर्षे ते आरवली सोन्सुरे येथे विविध प्रकारची वाळू शिल्पे साकारत आहेत. त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












