रेल्वे प्रवासादरम्यान हॅन्ड बॅगमधील 39 हजार रुपये अज्ञाताने लांबवले

रत्नागिरी | प्रतिनिधी : 
रेल्वे प्रवासादरम्यान हॅन्ड बॅग लांबवून अज्ञाताने तब्बल 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 ते 5 वा. दरम्यान त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसमध्ये घडली होती.

याबाबत प्रवासी महिलेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ही महिला त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसने निजामुद्दीन दिल्ली ते गोवा असा प्रवास करत होती. 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 ते 5 या दरम्यान, त्यांची रेल्वे ही रत्नागिरी कार्यक्षेत्रात आली असता फिर्यादी झोपी गेल्या असताना अज्ञाताने त्यांची हॅन्डबॅग लांबवली. त्यामध्ये रोख 35 हजार रुपये आणि बॅगची किंमत 4 हजार असा एकूण 39 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.