शांतीनगर येथे आईचा खून करणार्‍या संशयित मुलाला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : प्रतिनिधी
कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने त्या त्रासाला कंटाळून जन्मदात्री आई पूजा शशिकांत तेली (45,रा.भवानीमंडपजवळ शांतीनगर, रत्नागिरी) हिचा निर्घूण खून करणार्‍या संशयित मुलाला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
अनिकेत शशिकांत तेली (25, रा. भवानीमंडप जवळ शांतीनगर, रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे. वडिलांनी काढलेले कर्ज आणि स्वतःची बेरोजगारी या सर्वाला कंटाळून त्याने 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या आईचा गळा सूर्‍याने चिरुन तिचा खून केला. त्यानंतर स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तब्बल 16 दिवसांच्या उपचारांनंतर त्याला गुरुवार 11 सप्टेंबर रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयातून सोडण्यात आल्यावर शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालीन कोठडीत करण्यात आली.