कॅप्सन् इन्स्टिट्यूट कोटा मार्फत रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी केईएम मुंबई येथील डॉक्टर महेश अभ्यंकर यांचे अकरावी मधून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट सक्सेस मंत्रा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
डॉक्टर महेश अभ्यंकर हे ग्लोडरमा कंपनीचे डायरेक्टर असून औषध निर्मिती क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व विद्यार्थी मार्गदर्शनात ते अग्रेसर असतात. आजवर सरांनी सतराशे हुन अधिक शैक्षणिक व्याख्याने दिलेली असून त्यांची अनेक पुस्तके तसेच संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत.
दोन तास चाललेल्या या परिसंवादात सरांनी अभ्यासाबाबतच्या सर्व बाबींना स्पर्श करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थी यशात पालकांचा सहभाग आरोग्य व इतर मूलभूत गोष्टी उलगडून सांगितल्या. कॅप्सन् इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी व्याख्यान दिले त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थी व पालकांच्यात दिसून आला. सदर कार्यक्रमात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कॅप्सन् इन्स्टिट्यूट चे श्री निकम सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. भावे मॅडम यांनी स्वागत केले व सचिव श्री भातडे सर यांनी आभार मानले











