सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री देव पिंपळ मारुती मंदिराचा प्रथम वर्धापन दिन चैत्र शुक्लपक्ष त्रयोदशी गुरुवार दिनांक १० एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १० एप्रिल रोजी
सकाळी ९ वाजता – यजमान देहशुद्धी, प्रायश्चित्त, संकल्प, प्राकार शुद्धी, श्री महागणपती पूजन, लघु रुद्राभिषेक, महापूजा, आरती आणि तीर्थप्रसाद, सायं. ६ वाजता स्थानिक महिला मंडळाचे भजन, सायं. ७ वा. – महाआरती, तीर्थप्रसाद, सायं. ७.३० वाजता एम. जे. डान्स अकॅडमी, सावंतवाडी श्री. महेश झांबुरे प्रस्तुत व्हरायटी शो.
तर शुक्रवार ११ एप्रिल रोजी
सकाळी ९ वा. – यजमान देहशुद्धी, प्रायश्चित्त, संकल्प, श्री महागणपती पूजन, रुद्राभिषेक आवर्तने, महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ५ वाजता हळदीकुंकू समारंभ, स्थानिक महिलांचे भजन, रात्री ७ वा. – महाआरती, तीर्थप्रसाद, सायं. ७.३० वा. – सुप्रसिद्ध गायक श्री. शुभम नाईक, गोवा यांचा ‘भजन संध्या’ संगीतमय कार्यक्रम होणार आहेत.
तर १२ एप्रिल रोज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार असून सकाळी ९ वा. – श्री महागणपती पूजन श्री पवमान पंचसूक्त अभिषेक, महापूजा, आरती तीर्थप्रसाद, दुपारी २ वा. – श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५ वा. – स्थानिक महिलांचे भजन, सायं. ६ वा. – महाआरती, तीर्थप्रसाद, दीपोत्सव, सायं. ७ वा. – श्री साई गणेश भजन मंडळ, बांदा यांचे भजन, रात्री ७.३० पासून – महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर, सावंतवाडी लगत असलेल्या या मंदिरालगत असलेल्या या मंदिरात आयोजित
सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव पिंपळ मारुती मंदिर कमिटी तर्फे करण्यात आले आहे.









