खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन…

उद्योजक प्रसन्न घोडगे यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा… 

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व युवासेना सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित ‘खासदार चषक २०२५ ‘ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांच्या हस्ते जिमखाना मैदान येथे मंगळवारी सकाळी पार पडले. यावेळी श्री. घोडगे यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर कार्यकारिणीच्या शहराध्यक्षा सौ. भारती मोरे, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, शहरप्रमुख निखिल सावंत, देव्या सूर्याजी, वर्धन पोकळे, संकल्प धारगळकर, रोहित पोकळे, नील प्रभू , चेतन गावडे, साईश वाडकर, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, दिग्विजय मुरगुड, वसंत सावंत, मुकेश ठाकूर, गणेश कुडव, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी श्री. घोडगे म्हणाले, खेळामध्ये हार जीत ही होतच असते. मात्र, खिलाडू वृत्तीने आपला खेळ करणे हे खेळाडूंचे कर्तव्य असते. त्या दृष्टीने आपण ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडूया. तसंच पुढील वर्षीही याहून मोठा भव्य दिव्य खासदार चषक आयोजित करूया. या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्व संघातील खेळाडूंना शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन केले.

यावेळी विविध संघांमधील खेळाडू, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.