देवगड मधील ग्रामपंचायत आरक्षण जाहीर

देवगड / प्रतिनिधी

सन २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी देवगड तहसीलदार कार्यालयात सोडत प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी श्री. जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेत ५० टक्के महिला आरक्षणाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातून २४ ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १० ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीसाठी १ ग्रामपंचायत आणि अनुसूचित जातीसाठी २ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले.

आरक्षण सोडतीसाठी सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी श्री. कातकर यांच्यासोबत तहसीलदार रमेश पवार, नायब तहसीलदार विवेक शेठ, श्री. शेटये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांताधिकारी कातकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांना आरक्षण सोडतीचे निकष समजावून सांगितले.

यानंतर शाळकरी विद्यार्थी साईशा शशांक साटम, अनुश्री स्वप्नील पवार, रोशन केदार सावंत, तनेश शुभानंद कोयंडे यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत प्रक्रिया राबविण्यात आली.

आरक्षणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जाती प्रवर्ग: हडपीड, कुणकवण

अनुसूचित जाती (महिला): दहिबाव, महाळुंगे

अनुसूचित जमाती (महिला): पेंढरी

नागरिकांचा मागास प्रवर्ग: बुरंबावडे, उंडील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा, शिरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): इळये, कुवळे, नाडण, तळवडे, वळिवंडे, हिंदळे, पावणाई, टेंबवली, कुणकेश्वर, मणचे

सर्वसाधारण प्रवर्ग: गढीताम्हाणे, आरे, शिरवली, मुटाट, पोंभुर्ले, कोटकामते, पुरळ, रहाटेश्वर, पोयरे, गिर्ये, साळशी, गोवळ, फणसगाव, विठ्ठलादेवी, लिंगडाळ, मोंड, वाघोटण, रामेश्वर, धालवली, वानिवडे, मळेगाव, पडवणे, ठाकुरवाडी

सर्वसाधारण (महिला): कोर्ले, मिठमुंबरी, चांदोशी, ओंबळ, नारिंग्रे, खुडी, नाद, वाघिवरे, किंजवडे, पडेल, वाडा, बापर्डे, वरेरी, मिठबाव, पाटगाव, सांडवे, चाफेड, पाटथर, पाळेकरवाडी, मोंडपार, फणसे, तिर्लोट, सौंदाळे, तांबळडेग