तसेच अंगणातील मोटरसायकल देखील नेली चोरून लांजा शेवरवाडीतील घटना
संतोष कोत्रे l लांजा –: अज्ञात चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश करून बेडरूम मधील निकॉन कंपनीचा कॅमेरा तसेच अंगणात उभी असलेली मोटरसायकल ऐसा ऐवज चोरून नेल्याची
घटना लांजा शहरातील शेवरवाडी येथे घडली आहे. ही घटना दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा शेवरवाडी येथे रमाकांत मानकर यांचा प्राजक्ता नामक बंगला असून या बंगल्यात सोनल नितीन पवार (वय २९) या भाड्याने राहतात. अज्ञात चोरट्याने या घराच्या दर्शनी दरवाजाचे कडी कोयंड्यातील कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेला ५ हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा (मॉडल ५६००) चोरून नेला.याचवेळी चोरट्याने याच बंगल्याचे मालक रमाकांत मानकर यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडले आणि आतील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर मानकर यांच्या मालकीची, अंगणात उभी केलेली १० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर एक्सटेक मोटारसायकल (क्रमांक MH 08 BD 2668) देखील चोरून नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी सोनल पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ आणि ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.










